बुधवार, १५ मार्च, २०१७

उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी काॅम्प्युटर कोर्स..Course on Computer Concepts (CCC)

नमस्कार मित्रांनो,
        
        आजच्या घाईच्या अाणि व्यस्त जिवनमान असलेल्या जिवणशैलीत अनेक कामे करावी लागतात. कधी-कधी तर कामांना वेळ देणे सुद्धा शक्य होत नाही. काही कामे सहसा वर्षातून एकदा, महिन्यातून एकदा, अाठवड्यातून एकदा किंवा काही कामे तर दररोजच करावी लागतात उदा. लाईट बिल, फोन बिल, डी. टी. एच रिचार्ज, प्रोपर्टी टॅक्स, कोणालाही अगदी पैसे पाठवणे असो, या सर्व कामांसाठी बॅंकेत तासनतास लाईनला उभे राहणे म्हणजे कामावर सुट्टीच घ्यावी लागू शकते. त्याच बरोबर शासन स्तरावर नेहमीच अापल्यासाठी नव-नविन योजना येत असतात परंतू अपूऱ्या वेळे मुळे व माहितीमुळे त्याचे बारकावे शोधुन त्यांचा फायदा घेणे शक्य होत नाही ह्या सर्वांच्याच अडचणी अाहेत. 
        कामा सोबत अापली पाल्य यांची शैक्षणिक प्रगती अाणि त्यांच्या भविष्यात त्यांना फायदेशीर ठरणारे निर्णयही अापणाला योग्य वेळी घेणे गरजेचे असते. खास करुन दहावी, बारावी नंतर तर मुलांची खरी स्पर्धा सुरु होते. या स्पर्धेत टिकण्यासाठी त्यांना योग्य ज्ञान अाणि मार्गदर्शन लाभदायक ठरते. ह्या अनुशंगानेच दहावीच्या व बारावीच्या सुट्टीत वेळ वाया न जाऊ देता अापल्या पाल्याला काॅम्प्युटरचे ज्ञान मिळवण्यासाठी व  काॅम्प्युटरचे ज्ञान वाढवीण्यासाठी CCC (Course on Computer Concept's) हा काॅम्प्युटर कोर्स 100% फायदेशीर ठरतो. 
      CCC (Course on Computer Concept's). हा काॅम्प्युटर काेर्स भारतसरकारच्या NIELIT (National Institute of Electronics and Information Technology, New Delhi) अर्थात राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिकी एवं सूचना प्रौद्योगिकी संस्थान, ह्यांच्या मार्फत राबवीला जातो. NIELIT ही  Ministry of Electronics & Information Technology, भारत सरकार यांची स्वायत्त संस्था अाहे. CCC हा NIELIT च्या डिजीटल लिट्रेसी मिशन अंतर्गत चालवला जाणारा कंम्प्यूटर कोर्स अाहे. 

  • CCC हाच काॅम्प्युटर कोर्स का निवडावा त्याची काही ठळक कारणे ...
1) CCC काॅम्प्युटर कोर्स असा एकमेव काॅम्प्युटर कोर्स अाहे की जो यशस्विरीत्या पुर्ण केल्या नंतर शासकीय सेवांसाठी महाराष्ट्र तसेच इतर राज्यांतही शायकीय सेवेसाठी संगणक हाताळणी प्रमाणपत्र म्हणुन ग्राह्य धरला जातो. 
2) CCC काॅम्प्युटर कोर्स अंतर्गत 80 तासांचे प्रशिण दिले जाते त्यात प्रॅक्टिकल, थेअरी व टुटोरीअल ह्यांचा समावेश असतो.
3)  प्रॅक्टिकलसाठी MS-OFFICE मधिल एम. एस, वर्ड, एम. एस, एक्सेल, एम. एस, पावरपाॅईंट, एम. एस, अाऊटलुक, फायनान्शिअल इनक्ल्युजन व इंटरनेट यासारखी टुल्सचे असाईनमेंट बेस ट्रेनिंग दिले जाते. 
अ) एम. एस, वर्ड - यात प्रामुख्याने अॅपलीकेशन लेटर पासुन ते अाॅफिशीअल डाॅक्युमेंट्स पर्यंत
ब) एम. एस, एक्सेल यात प्रामुख्याने अभ्यासाचे वेळापत्रक ते व्यावसाईक सॅलरीशीट फाॅर्म्युलाच्या वापर करुन तयार करणे पर्यंत.
क) एम. एस, पावरपाॅईंट - यात प्रमामुख्याने अॅनिमेटे़ड टेक्स व ग्राफिक्स पासून बिजनेस प्रेझेंटेशन पर्यंत 
ड) एम. एस, अाऊटलुक यात प्रमामुख्याने ई-मेल, शेड्युल, इव्हेंट व मिटिंग पर्यंत.
इ) इंटरनेट - ई-मेल अकाऊंट तयार करणे, ई-मेल पाठविणे, ई-मेलला रिप्लाय करने, कि वर्डच्या सहाय्याने माहितीचा  शोध  घेणे व  इंटरनेटचा सुरक्षित वापर करणे इ. व अाणखी बरेच काही.
ई) फायनान्शिअल इनक्ल्युजन -  यात प्रमामुख्याने बॅंकिंग, विमा, ई-गव्हर्नंन्स, भारत सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजना, मोबाईल बॅकिंग, UPI App, वेगवेगळी पेमेंट गेटवे, अाधार बेस पेंमेंट्स या सारखी दैनंदिन जिवणात अावश्यक ती टुल्स सुरक्षीत कशी वापरता येतिल याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते.
* थेअरी,  कंम्प्यूटर विकत घेताना घ्यावयाची काळजी, अावश्यक हार्डवेअरची निवड त्याच बरोबर कंम्प्यूटरचे बेसीक पार्ट्स, हार्डवेअर, साॅफ्टवेअर ते अार्टिफिशीअल इंटिलीजंट्स पर्यंतची माहीती अभ्यासली जाते.
* प्रशिक्षणाचे माध्यम व स्टडी मटेरीअल - प्रशिक्षण स्थानिक भाषांत घेवू शकता, अभ्यास पुस्तके NIELIT कडुन ई-बुक व ई-लर्निंगच्या माध्यमात हिंदी, इंग्रजीसह 23 प्रादेशिक भाषेत पुर्णपणे मोफत उपलब्ध करुन देण्यात अाली अाहे. 

  
परिक्षा, निकाल व प्रमाणपत्र - 1) सी. सी. सी. ची परीक्षा NIELIT कडून नियुक्त शासन मान्याताप्राप्त केंद्रात 100% अाॅनलाईन पद्धतीने घेतली जाते. 2)परीक्षा झाल्यानंतर अाॅनलाईन निकाल 3) व लगेचच डिजीटल साईन केलेले प्रमाणपत्र डाऊनलोड करता येते.
Digital Signed Certificate after successfully completion of course
CCC Digital Signed Certificate
प्रशिक्षण केंद्र कसे शोधाल - NIELIT च्या वेब साईटवर अधिकृत प्रशिक्षण केंद्रांची राज्यां प्रमाणे यादी उपलब्ध अाहे. कोर्सचे सर्व फायदे मिळण्यासाठी अधिकृत केंद्र निवडणे गरजेचे अाहे.
       वरील सर्व बाबींचा विचार केला असता असे लक्षात येईल की अापणास व पाल्यास हवी असलेली सर्व कौशल्य ह्या कोर्स अंतर्गत साध्य होतील अाणि दैनंदिन कामकाजात त्यांचा अापणास उपयोगही होईल.  ह्या व्यतीरीक्त प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रास भेट दिल्यास अधिक माहिती घेता येईन....
तर चला सुट्टीचा वेळ तंत्रज्ञानाशी संबंधीत ज्ञान देणाऱ्या CCC सोबत घालवूया.....!!!

- Mr. Sandeep Pund
  Saisan Computer Education,
  Rahata Tal: Rahata Dist: Ahmadnagar 
  Mob: 9960909367
  Email: support.saisan@gmail.com
  website: www.saigenedu.com